Meta प्रॉडक्ट वापरत नसलेल्या लोकांसाठी माहिती
लिंक कॉपी करा
आम्हाला ते आमच्या युझरकडून Facebook, Messenger किंवा Instagram वर (“संपर्क अपलोड करणे”) उपलब्ध असलेल्या संपर्क अपलोड करणे किंवा संपर्क सिन्क करणे या फीचरद्वारे प्राप्त झाल्यास Meta Platforms, Inc. (“Meta”, “आम्ही”, “आमचे” किंवा “आम्हाला”) तुमचे नाव, मोबाइल फोन नंबर, आणि/किंवा तुमचा ईमेल अॅड्रेस यावर प्रक्रिया करतो. तुम्ही Facebook, Messenger किंवा Instagram चे युझर नसाल आणि/किंवा आमच्यासह तुमचे खाते नसले, तरीदेखील आम्ही या माहितीवर प्रक्रिया करतो (“युझर नसलेले”).
संर्पक अपलोड करणे आणि ते कसे काम करते याबद्दल
युझर जेव्हा संपर्क अपलोड करणे याचा वापर करतो आणि त्यांच्या डिव्हाइसमधील अॅड्रेस बुकचा अॅक्सेस मंजूर करतो. आम्ही त्यांच्या अॅड्रेस बुकमधील नावे, फोन नंबर आणि ईमेल अॅड्रेस दररोज अॅक्सेस करून ती आमच्या सर्व्हरवर अपलोड करू, यात Facebook, Messenger आणि/किंवा Instagram वरील युझर आणि युझर नसलेले इतर संपर्क किंवा ज्यांचे खाते नाही (म्हणजेच युझर नसलेले) अशा व्यक्तींचा समावेश आहे.
युझर नसलेल्या व्यक्तींबद्दल कोणती माहिती संकलित केली जाते
आम्ही युझरच्या संपर्कांचे नाव, मोबाइल फोन नंबर आणि किवा/ईमेल अॅड्रेस संकलित करतो.
आम्ही युझर नसलेल्या व्यक्तीची माहिती कशी वापरतो
संपर्क अपलोड करणे हे ऐच्छिक फीचर आहे जिथे युझर त्यांची डिव्हाइस अॅड्रेस बुक Facebook, Messenger आणि/किंवा Instagram वर अपलोड करण्याची निवड करू शकतात. आम्ही कोणताही नंबर किंवा ईमेल अॅड्रेस युझरच्या मालकीचा आहे की नाही हे पाहण्यासाठी अॅड्रेस बुकमधील नावे, फोन नंबर आणि/किंवा ईमेल अॅड्रेसवर प्रक्रिया करतो. युझरचा संपर्कदेखील Facebook, Messenger आणि/किंवा Instagram वर असल्यास, आम्ही Facebook वरील या संपर्काला Facebook च्या युझरच्या तुम्ही कदाचित ओळखत असलेले लोक मधील अन्य एखादी व्यक्तीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचे किंवा सुचवलेले खाते म्हणून Instagram वर फॉलो करण्याचे सुचवू शकतो. Facebook, Messenger आणि/किंवा Instagram वरील युझरच्या संपर्कासदेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले लोक आणि गोष्टींची शिफारस केली जाऊ शकते, जेणेकरून आम्ही त्यांना आणखी चांगली सेवा ऑफर करू शकतो. युझर Facebook, Messenger आणि/किंवा Instagram मध्ये सामील होण्यासाठी टेक्स्ट किंवा ईमेलद्वारे युझर नसलेल्या व्यक्तींना आमंत्रितदेखील करू शकतात.
संपर्क अपलोड करणे यामुळे आम्हाला Facebook चा युझर म्हणून सामील होणार्या अशा युझर नसलेल्या व्यक्तीला मित्र म्हणून युझरसाठी तुम्ही कदाचित ओळखत असलेले लोक याद्वारे जोडण्यासाठी किंवा Instagram वर फॉलो करण्यासाठी सुचवलेले खाते म्हणून सूचवतादेखील येते.
अखेरीस, आम्ही Meta प्रॉडक्ट वरील संशयास्पद अॅक्टिव्हिटीचा तपास करण्यासाठी आणि आमचा प्लॅटफॉर्म सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी अपलोड केलेली अॅड्रेस बुकदेखील वापरू. आम्ही लोकांची आणि Meta कंपनी प्रॉडक्ट च्या युझरची गणना अचूकपणे करण्यासाठी अपलोड केलेली अॅड्रेस बुक वापरून व्यवसाय बुद्धिमत्ता आणि विश्लेषणदेखील करतो.
Meta हे आम्ही संकलित करतो ती माहिती, पायाभूत सुविधा, सिस्टीम आणि तंत्रज्ञान इतर Meta कंपन्या यांच्यासोबत शेअर करते. आम्ही युझर नसलेल्या व्यक्तींचा डेटा इतर Meta कंपन्यांसोबत संपर्क आयात करणे फीचर प्रदान करता यावे, यासाठी आणि वरती नमूद केलेल्या हेतूंसाठी शेअर करतो.
युझरना संपर्क आयातकर्ता हे फीचर प्रदान करण्यासाठी आणि वर वर्णन केलेल्या हेतूंसाठी आम्ही युझर नसलेल्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती आवश्यक असेपर्यंत राखून ठेवतो. विशिष्ट प्रकरणांमध्ये, आम्हाला तुमची संपर्क माहिती अधिक काळ राखून ठेवणे गरजेचे असते, यात तुम्ही ती खोडून टाकण्यास सांगता त्यानंतरचा काळ समाविष्ट आहे. यामध्ये कायदेशीर विनंतीला प्रतिसाद देणे किंवा लागू कायद्याचे पालन करणे, नियामक किंवा खटल्यासंबंधित प्रकरणांसाठी, हानी टाळण्यासाठी किंवा सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडतेच्या उद्देशांसाठी यांसारख्या कायदेशीर कारणांचा समावेश आहे. आम्हाला ते राखून ठेवण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी विशिष्ट कारणावर अवलंबून असेल.
युझर नसलेल्या व्यक्ती त्यांचे अधिकार कसे वापरू शकतात
आम्ही युझर नसलेल्या व्यक्तींना लागू होणार्या कायद्यांच्या अंर्तगत त्यांचे अधिकार वापरण्याची क्षमता प्रदान करतो. तुमचे अधिकार वापरण्यासाठी, खालील संपर्क माहिती वापरून आमच्याशी संपर्क साधा.
गोपनीयता कशा प्रकारे काम करते याबद्दल तुम्ही Facebook वर आणि Instagram वर तसेच Facebook मदत केंद्र मध्ये अधिक जाणून घेऊ शकता.
आम्हाला आशा आहे की युझर नसलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीवर आम्ही ज्यापद्धतीने प्रक्रिया करतो त्याबद्दल त्यांना असू शकणार्या कोणत्याही प्रश्नांचे समाधान आम्ही करू शकतो. काही देशांमध्ये तुम्ही Meta Platforms, Inc. साठी डेटा संरक्षण अधिकाऱ्याशीदेखील संपर्क साधू शकता आणि तुमच्या अधिकारक्षेत्रानुसार, तुम्ही तुमच्या स्थानिक डेटा संरक्षण प्राधिकरणाशी (“DPA”) थेट संपर्कदेखील साधू शकता.
तुमच्याकडे असू शकतात अशा अधिकारांबद्दल तुम्हाला प्रश्न असल्यास येथे क्लिक करा.
आम्ही माहिती कशी ट्रान्स्फर करतो
आम्ही जागतिक स्तरावर संकलित करतो ती माहिती आम्ही आमच्या ऑफिसमध्ये आणि डेटा सेंटरमध्ये अंतर्गतरीत्या आणि आमचे भागीदार, सेवा पुरवठादार आणि व्हेंडर यांच्यासोबत बाह्यरीत्या शेअर करतो. Meta हे ग्लोबल असून त्याचे युझर, भागीदार आणि कर्मचारी जगभरात आहेत, अनेक कारणांसाठी ट्रान्स्फर आवश्यक असतात, यात या डेटा सूचनेत वर्णन केल्यानुसार आम्ही सेवा संचालित आणि प्रदान करू शकण्याचा समावेश आहे.
युझर नसलेल्या व्यक्तींची माहिती ही येथे ट्रान्सफर किंवा प्रसारित अथवा स्टोअर आणि प्रक्रिया केली जाईल:
- ज्या ठिकाणी आमच्या पायाभूत सुविधा किंवा डेटा सेंटर आहेत, त्यामध्ये युनायटेड स्टेट्स, आयर्लंड, डेन्मार्क आणि स्वीडन, तसेच इतर काहींचा समावेश आहे
- असे देश जिथे Meta प्रॉडक्ट उपलब्ध आहेत
- या डेटा सूचनेत नमूद केलेल्या उद्देशांसाठी इतर देश जिथे आमचे भागीदार, सेवा पुरवठादार आणि व्हेंडर हे तुम्ही राहत असलेल्या देशाहून भिन्न देशामध्ये आहेत.
आंतराष्ट्रीय डेटा ट्रान्स्फरसाठी आम्ही योग्य त्या यंत्रणांवर अवलंबून राहतो. उदाहरणार्थ, आम्ही संकलित केलेल्या माहितीसाठी:
- आम्ही अशी स्टँडर्ड करारात्मक कलमे वापरतो जी युरोपीयन कमिशन आणि इतर समर्पक अधिकार्यांनी मंजूर केली आहेत.
- इतर देशांकडे डेटा संरक्षणाची पुरेशी पातळी आहे की नाही यासाठी आम्ही युरोपीयन कमिशन आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर अवलंबून आहोत.
- आम्ही युनायटेड स्टेट्स आणि इतर संबंधित देशांमध्ये डेटा ट्रान्स्फरवर लागू असलेल्या लागू कायद्यांनुसार समतुल्य यंत्रणा वापरतो.
आमच्याशी संपर्क साधा
तुम्हाला या सूचनेबद्दल प्रश्न असल्यास किंवा तुमच्या माहितीच्या संदर्भात प्रश्न, तक्रारी किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा फॉर्म वापरा.
वैकल्पिकपणे, तुम्हाला फॉर्मचा अॅक्सेस नसल्यास, तुम्ही खालील पत्त्यावर लिहूनदेखील आम्हाला कळवू शकता:
Meta Platforms, Inc.
ATTN: Privacy Operations
1601 Willow Road
Menlo Park, CA 94025
Other ways to get help
Chat with Meta AI support assistant
Resolve issues, make changes and get support in real time

